4

संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
       xxxchya नावाचा लागलाय मला छंद


जो करील आदर पत्नीचा त्याचा संसार सुखाचा ,
           संगम झाला कृष्णा कोयनेचा हा खेळ ईश्वराचा ,
           जेव्हा मन मोकळे झाले xxx चे,
           तेव्हा पुष्पहाराने स्वागत केले xxx चे.


शुक्र चांदणी सारखा तर एकदाच घ्यावा निरखून,
        xxx सारखा हिरा एकदाच घेतलाय पारखून.


सुराविना कळला साज संगीताचा,
        xxx नावात गवसला अर्थ जीवनाचा.


सहानुभूतीच्या गुलाबी पाकळ्यात प्रेमाची भर पडताच, तयार होतो प्रेमाचा गुलकंद,
        xxxxxxxxxx  नावातच सामावलाय माझा आनंद.


हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ........
माझी झाली.



भाजित भाजी मेथिची ....माझ्या प्रितीची


उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ---------- च्या गळयात 



नाशिकची द्राक्षे, नागपुरची संत्री
---------- आज पासुन माझी ग्रुहमंत्री 



ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
-------- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल 



बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
-------- चे नाव घेतो लग्नाच्या राती



मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
-------- चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा



क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
-------- देतो मी लाडवाचा घास




वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर
-------- आहे माझी सर्वापेक्षा सुंदर



गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल -------- आपण सारीपाट खेळू




मातीच्या चुली घालतात घरोघर
-------- झालीस माझी आता चल बरोबर



एक आहे चीवू एक आहे काऊ .......च नाव घेतो डोक नका खाऊ.




No comments:

Post a Comment

Popular Posts